

Nagpur
esakal
नागपूर: गुन्ह्यांचा तपास अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी राज्य सरकारच्या ‘मार्व्हल’ या विशेष उद्देश संस्थेकडून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘एआय इन्व्हेस्टीगेशन प्लॅटफॉर्म’ विकसित करण्यात येत आहे. प्रारंभी या प्रणालीची दोन पोलिस युनिट्समध्ये प्रायोगिक अंमलबजावणी होणार असून त्यानंतर राज्यभर विस्ताराचा निर्णय घेतला जाणार आहे.