Girish Mahajan:'सत्तेतील भागिदारांमुळे होत आहे मोठी अडचण', गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी सत्तेत भागिदार वाढल्याने दुय्यम खाते मिळाले अशी खंत व्यक्त केली.
Girish Mahajan:'सत्तेतील भागिदारांमुळे होत आहे मोठी अडचण', गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत

Girish Mahajan on Power Sharing: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी सत्तेत भागिदार वाढल्याने दुय्यम खाते मिळाले अशी खंत व्यक्त केली. सोबतच वारंवार खाते बदल होत असल्याने काम कसे करावे, हे समजत नसल्याचेही सांगितले.

मित्रपक्षांचेही ऐकावे लागते. त्यांच्या मागण्यासाठी काही खाते बदलही करावे लागते. त्यामुळे अडचण झाली असल्याचे त्यांनी हसत हसत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. (Latest marathi News)

पर्यटन खाते सांभाळणारे गिरीश महाजन खासदार औद्योगिक महोत्सवाच्या समारोपासाठी नागपूरला आले होते. ते म्हणाले, माझे तीन सचिव आतापर्यंत बदलले आहेत. त्यामुळे कसे काम करावे, हे मला कळत नाही. अजून सात आठ महिने हे खाते माझाकडे ठेवले तर मला काहीतरी करता येईल, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Girish Mahajan:'सत्तेतील भागिदारांमुळे होत आहे मोठी अडचण', गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत
Tata Group: परदेशी शिक्षणासाठी TATA करणार मदत; 'इतक्या' लाखांपर्यंत देणार शैक्षणिक कर्ज

‘भाऊ तुम्ही परमानंट पर्यटन मंत्री’

महाजन यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका, तुम्ही आमचे परमनंट पर्यटन मंत्री आहात. तुम्हाला उत्तर महाराष्ट्र असो वा विदर्भ जिथे वाटते तेथे पर्यटन वाढवा. आमचा तुम्हाला पाठिंबाच राहील, असेही ते म्हणाले.(Latest marathi News)

Girish Mahajan:'सत्तेतील भागिदारांमुळे होत आहे मोठी अडचण', गिरीश महाजन यांनी व्यक्त केली खंत
Indian Navy: भारतीय नौदलाने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; जहाजावरील 19 पाकिस्तानी नागरिकांना सोडवलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com