Ravindra Chavan
sakal
नागपूर
Ravindra Chavan: महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार; भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही, जानेवारीत रणधुमाळीचे संकेत
Local Body Elections: आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात कशाप्रकारे पुढे जायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संयुक्त बैठक झाली.

