नागपूर - बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील मुख्य आरोपी भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे याला गुरुवारी (ता. १४) दुपारच्या सुमारास धरमपेठेतील त्याच्या घरातून सायबर पोलिसांनी अटक केली. गेल्या साडेचार महिन्यांपासून तो फरार होता. उच्च न्यायालयातून मंगळवारी (ता.१२) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.