
यवतमाळ : पाच अग्निशस्त्र, ३५० जिवंत काडतूसे, एक तलवार, बुलेट प्रूफ जॅकेट यासह इतरही घातक शस्त्रांचा साठा मिळाला. ही कारवाई सीमेवर नव्हेतर यवतमाळ शहरात करण्यात आली. एकाच ठिकाण मोठा साठा सापडल्याने पोलिसही चक्रावले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.३०) ही कारवाई केली.