

Land Inherited by Succession Is Self-Owned Property, Says High Court
sakal
नागपूर: मुलाला वडिलांकडून एखादी जमीन वारसाहक्काने मिळाली असल्यास हिंदू उत्तराधिकार अधिनियम, १९५६ नुसार ती मालमत्ता त्या व्यक्तीची स्वतंत्र मालमत्ता मानली जाईल. ती मालमत्ता विकण्यासाठी तो स्वतंत्र आहे. त्याच्या मुलांना ही वडिलांची संपत्ती स्वत:ची मानता येणार नाही आणि त्या जमिनीची विक्रीदेखील रोखता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.