

19 Workers Injured as Pickup Truck Overturns in Narkhed Taluka
esakal
जलालखेडा (नरखेड) : नरखेड तालुक्यातील मोवाड हद्दीत शेती कामासाठी जाणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन उलटल्याने १९ मजूर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) सकाळच्या सुमारास घडली. जखमींना मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेफर करण्यात आले.