

Newcomers Outshine Big Names in Nagpur Corporation Elections
Sakal
नागपूर: नवोदितांनी दिग्गजांना धूळ चारत मनपात दमदार एन्ट्री केली आहे. भाजपचे संदीप जाधव यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेसच्या मंजू चाचरकर, भूषण शिंगणे यांना पराभवाची धूळ चारणारे काँग्रेसचे शैलेश पांडे, भाजपच्याच माजी नगरसेविका प्रगती पाटील यांचा विजयाचा रथ रोखणारे अभिजित झा आणि भाजपचेच माजी नगरसेवक आणि अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचा पराभव करणारे शुभम मोटघरे हे ‘जायंट किलर’ ठरले.