esakal | कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर: भारतीय जनता पार्टीच्या काळात मेडिकलमधील प्रस्तावित ‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ औरंगाबाद येथील घाटी शासकीय रुग्णालयात पळविण्यात आले होते. त्यामुळे इन्स्टिट्यूटचे काम थांबले होते.आघाडी सरकारने मात्र, हा प्रश्न आता निकाली काढला असून मेडिकलमध्येच टीबी वार्ड परिसरात जागाही निश्चित केली. इतकेच नव्हे तर बांधकामाच्या निविदा काढण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

वैद्यकीय सचिव सौरभ विजय यांनी या प्रश्नावर २ सप्टेंबरला ऑनलाइन बैठक घेतली. टाटा कॅन्सर रुग्णालयाचे डॉ. कैलाश शर्मा यांच्याकडूनही ही संस्था उभारण्यासाठी मदत होईल, असे सांगितले होते. बैठकीतून केली. ७६ कोटीतून तीन माळ्यांची कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मेडिकलचे तत्कालीन कॅन्सररोग विभागप्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी कॅन्सरग्रस्तांचा लढा उभारला.

विधानसभेतही मुद्दा उपस्‍थित झाल्याने २०१२ मध्ये हिवाळी अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मेडिकलमध्ये कॅन्सर संस्था उभारण्याची घोषणा केली. डॉ. कांबळे यांनी प्रस्ताव तयार केले. मंजूरही झाले. परंतु आघाडी सरकार गेले अन् भाजपची सत्ता आली. फडणवीस सरकारने मेडिकलमध्ये मंजूर झालेले कॅन्सर इन्स्टिट्यूट औरंगाबादेतील घाटी शासकीय रुग्णालयात पळवले.

मुख्यमंत्री हे नागपूरचे होते, हे विशेष. औरंगाबादेत ही संस्था पळविल्याने डॉ. कांबळे यांनी तत्काळ न्यायालयात याचिका दाखल केली. २०१७ मध्ये न्यायालयाने दीड वर्षात ही संस्था उभारण्याचे आदेश देत ही याचिका निकाली काढली. मात्र शासनाकडून अद्यापही संस्था आकाराला आणता आली नाही. नुकतेच मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या प्रयत्नातून कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: नागपुरात "महिला" राज

डॉ. कांबळे यांची इच्छा होणार पूर्ण

कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉ.कृष्णा कांबळे अखेरच्या क्षणापर्यंत प्रस्तावित जागा मेडिकलच्या नावावर करण्यापासून तर कॅन्सर संस्था उभारणीसाठी प्रयत्न केले. मात्र अजूनही नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जागा नावावर झाली नाही. ही संस्था उभारण्यासाठी अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांच्यासह सद्याचे विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण प्रयत्नशील आहेत.

मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात होणारी कॅन्सर संस्था उभारण्यास टाटा संस्थेतर्फे मदत होणार आहे. विदर्भातील वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या लक्षात घेता मेडिकलमध्ये तयार होणारी संस्था गरिबांसाठी वरदान ठरेल.

-डॉ. सुधीर गुप्ता,

अधिष्ठाता,मेडिकल.

loading image
go to top