Widespread use of plastic in the market
Widespread use of plastic in the marketsakal

Malegaon: व्यापाऱ्यांना नाही राहिली प्रशासनाची भीती? बाजारात प्लॅस्टिकचा सर्रास वापर

व्यापारी लोक दंडात्मक कारवाईला जुमानत नाहीत. प्लॅस्टिक पिशव्या सप्लाय यंत्रणा खूप काळजीपूर्वक व तत्पर सेवा देते म्हणून या पिशव्यांचा वापर बंद करणे कठीण झाले आहे.

Malegaon Plastic Ban: शहरात प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापराचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर मागच्या मंगळवारी आठवडी बाजाराच्या दिवशी नगरपंचायतने दंडात्मक कारवाई केली.

सकाळी कारवाई केल्यावर दिवसभर प्लॅस्टिकचा वापर बंद होता. कारण प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांनी बाजारात येणे टाळले होते. परंतु आता पुन्हा पहिल्यासारखाच वापर सुरू झाला आहे.

व्यापारी लोक दंडात्मक कारवाईला जुमानत नाहीत. प्लास्टिक पिशव्या सप्लाय यंत्रणा खूप काळजीपूर्वक व तत्पर सेवा देते म्हणून या पिशव्यांचा वापर बंद करणे कठीण झाले आहे.

तसेच एक-दोन दुकानांवर कारवाई केली की, इतर दुकानदार सावध होऊन एक दिवस प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणे थांबवतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून वापर सुरू करतात म्हणून दुकानदारांवर कारवाई करण्याऐवजी प्लॅस्टिक पिशव्या (plastic bags) तयार करणाऱ्या फॅक्टरी मालकावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)

Widespread use of plastic in the market
Sharad Pawar: शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही! राजकारण सुरु असल्याचा मुद्दा ऐरणीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com