भीतीपोटी आत्महत्या; अबोला घेतलेल्या महिलेवर केला होता चाकू हल्ला

दुरून लोकांना येताना बघून घाबरलेल्या भारतने औषध प्राशन केले
poision
poisionpoision

भिवापूर (जि. नागपूर) : शेजारी राहणाऱ्या महिलेवर इसमाची वाईट नजर होती. याची पूर्ण माहिती असल्याने महिला त्याच्यासोबत बोलणे टाळत होती. तिने एकप्रकारे अबोला घेतला होता. परंतु, हे इसमाला मान्य नव्हते. यामुळे त्याने महिलेच्या घरात शिरत ‘माझ्यासोबत बोलत का नाही’ असे म्हणत चाकूने तिच्या पोटावर, मानेवर, कमरेवर व हातावर सपासप वार केले (Knife attack) होते. इसमाने सोमवारी अड्याळ हद्दीत शेतात विषारी द्रव्य (Took poison) प्राशन करून आत्महत्या केली. भारत अंडेलकर (वय ५०) असे मृत इसमाचे नाव आहे.

भारतच्या घराशेजारीच पौर्णिमा कुंभकरण सतीबावने (वय ३७) ही महिला राहते. भारतची तिच्यावर पूर्वीपासूनच तिच्यावर वाईट नजर होती. यामुळे महिलेने अबोला घेतला होता. रविवारी महिलेचा पती कामावर गेल्यानंतर आरी मागण्याच्या बहाण्याने भारत घरी गेला. ‘माझ्यासोबत बोलत का नाही’ असे म्हणत चाकूने सपासप वार करून (Knife attack) पळून गेला.

poision
शेजारी महिलेने धरला अबोला; रागाच्या भरात इसमाने केला चाकू हल्ला

हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली होती. पतीने नागरिकांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिला नागपूरला हलविण्यात आले. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून आरोपी भारतविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले पुढील तपास करीत होते. आता समाजात आपली बदनामी होईल, पोलिस तुरुंगात डांबतील या भीतीने भारतने आत्महत्या केल्याचे समजते.

महिलेवर हल्ल्या केल्यानंतर भारत पळून अड्याळ शिवारात असलेल्या त्याच्याच शेतात लपून बसला होता. सोमवारी ही बाब मुलगा योगेश भारत अंडेलकर (वय २४) याला समजली. तो दोन मित्रांना सोबत घेऊन वडिलाला भेटायला शेतावर गेला. दुरून लोकांना येताना बघून घाबरलेल्या भारतने जवळ असलेल्या विषारी औषधाच्या (Took poison) बॉटलमधील औषध प्राशन केले.

poision
दोन मित्र मृतदेह घेऊन होते फिरत; पोलिसांनी अडवल्याने झाले माहित

मुलगा योगेश व मित्रांनी भारतला वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी भारतला मृत घोषित केले. माहिती मिळताच ठाणेदार महेश भोरटेकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com