
कोदामेंढी (जि. नागपूर) : सहा वर्षांपूर्वी विहीर चोरीची घटना मौदा (mauda) तालुक्यातील खरडा येथे घडली. लोककल्याणकारी योजना राबविताना योजनेचा लाभ योग्य घटकाला आणि व्यक्तीला मिळावा, असा शासनाचा उद्देश असतो. त्यात पारदर्शकात असावी, यासाठी काही निकष देखील लावले जातात. मात्र, त्यातही अफरातफरी कशी करावी, हे प्रशासनातील काही निवडक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जमते. शासकीय अनुदान (government grants) लाटण्यासाठी कोण कधी कोणती शक्कल लढवेल, याचा नेम राहिला नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (prime minister housing scheme) निधी उचलून देखील घरकुलाचे बांधकाम केले नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. (man not construct home even he took money from gharkul scheme in kodamendhi of nagpur)
शासकीय योजनेच्या निधीवर डल्ला मारण्यासाठी कोण कोणती शक्कल लढवेल, याचा नेम राहिला नाही. मौदा तालुक्यातील वाकेश्वर येथील एका लाभार्थ्याने घरकुलाचा निधी हडप केला असून बांधकाम मात्र केले नाही. सन २०१७- २०१८ मध्ये त्याला पंतप्रधान घरकुल योजनेतून बांधकाम मंजूर करण्यात आले. बांधकामाचा एक लाख २० हजारांचा निधी उचल केला. बांधकाम पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायतीने तसे प्रमाणपत्र देखील दिले. पण वास्तविक पाहता बांधकाम झाले नसून केवळ रिकामी जागा शिल्लक आहे. गावातीलच संभा तिलक कुंडकार याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ग्रामपंचायतीला घरकुलाच्या बांधकामाबाबतची माहिती मागितली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. घरकुलाचे बांधकाम करताना टप्प्याटप्प्याने निधी वाटप केला जातो. सुरुवातीला पायवा, सज्जा लेवल, स्लॅब आणि नंतर प्लास्टर तसेच शौचालय बांधकाम केल्याचे फोटो सादर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे वळती करण्यात येते. मात्र, यांनी तर कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता संपूर्ण निधीवर डल्ला मारला आहे. यात एकटा लाभार्थी सहभागी नसून सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे कर्मचारी सहभागी असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतची तक्रार तहसीलदार आणि खंडविकास अधिकारी यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली. अद्यापपर्यंत कसलीही कारवाई करण्यात आली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.