अवघ्या १०० रुपयांसाठी 'तो' फिरतो ५० किलोमीटर; भर उन्हात राजेशची जगण्यासाठी धडपड

अवघ्या १०० रुपयांसाठी 'तो' फिरतो ५० किलोमीटर; भर उन्हात राजेशची जगण्यासाठी धडपड
Updated on

नागपूर : दुपारी दोनची वेळ. मोहल्ल्यातील प्रत्येक घरातील दरवाजे बंद. कुलरचा आवाजही बाहेरच्या आवाजावर कुरघोडी करतो. तरीही पोटाची आग शांत करण्यासाठी आवाज येतो. मडके घ्या मडके… थंड पाण्याचे मडके (Pot). फ्रिजसारखे पाणी प्या... मडके घ्या मडके.. हा आवाज आहे घामाने भिजलेल्या राजेश वानखेडे या तरुणाचा. सकाळी सात वाजल्यापासून मडके विक्रीकरिता फिरत आहे. ५० किलोमीटरचे अंतर कापून हाती फक्त १०० रुपये मिळाले. दोन वेळच्या अन्नासाठी तो भिंगरी बांधल्यागत फिरत आहे. असे एक नाही तर शेकडो राजेश पोटासाठी मिळेल व्यवसाय करीत आहेत.कोरोनाने मात्र, त्यांच्या पोटावर लाथ हाणली आहे. (Man travel for 50 kM for buying pots in Nagpur)

अवघ्या १०० रुपयांसाठी 'तो' फिरतो ५० किलोमीटर; भर उन्हात राजेशची जगण्यासाठी धडपड
लॉकडाउनमुळे मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं; जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ

कोरोनामुळे (corona) अनेक कंपन्या बंद पडल्या. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लघुउद्योग आचक्या देत आहेत. मिळेल ते काम करून कुटुंबाला जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. असाच प्रयत्न सुभाषनगर येथील राजेश वानखेडे करीत आहे. ३५ वर्षांवर असलेला राजेश मडकी विकण्याचा व्यवसाय करीत आहे. घरी पाच लोक आहे. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी राजेशवर आहे. गेल्या वर्षापासून त्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली.

ऐन हंगामात लॉकडाउन लावण्यात येतो. गेल्यावर्षीच्या वाईट अनुभवानंतर तो सावध झाला. यावर्षी तरी मडकी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा होती. मात्र कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आणि होत्याचे नव्हते झाले. राजेश सकाळी तीनचाकी सायकलवर २० ते२५ मडकी घेऊन विक्रीला निघतो. सकाळपासून दुपारी तीन पर्यंत शहरातील विविध भागात फिरतो. अंदाजे ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर होत असेल. आजही राजेश मानेवाडा परिसरात आला. गल्लोगल्ली फिरून त्याने फक्त १० मडकी विकली. हे मडकी विकताना दुपारचे दोन वाजले होते.

एक मडके १०० रुपयाला विकतो. आणि एका मडक्यावर दहा रुपये मिळतात. फक्त १०० रुपयासाठी तो ५० किलोमीटर फिरला. फिरून-फिरून पायाला गोळे आल्याचे राजेश सांगत होता. कोरोनामुळे ग्राहक जवळ यायला तयार नाहीत. राजेश सांगतो, तीनचाकीवरून मडकी विकणारी माझ्यासारखे शंभरावर युवक आहेत. दोन महिन्याचा हा व्यवसाय आहे. त्यानंतर दुसरा व्यवसाय करावा लागतो. कोरोनाने पोटावर लाथ मारली त्यातून बाहेर कसे पडायचे समजत नाही. सरकारही काही मदत करीत नसल्याची खंत त्याला आहे.

अवघ्या १०० रुपयांसाठी 'तो' फिरतो ५० किलोमीटर; भर उन्हात राजेशची जगण्यासाठी धडपड
"आपल्या अपयशाचं खापर मागील सरकारवर फोडणं हेच राज्य सरकारचं काम"

उदयनगर चौकातील दुकानात शुकशुकाट

म्हाळगीनगर ते उदयनगर चौकात मडकी विकणारी दोन दुकान आहेत. मात्र, त्यांच्याकडेही फारसे ग्राहक फिरत नाही. दोन हजारांवर मडकी त्यांच्याकडे पडून आहे. यावर्षाचा हंगाम फक्त एक महिन्याचा शिल्लक आहे. अशाप्रसंगी मडकी न विकल्यास मोठे नुकसान होणार असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

(Man travel for 50 kM for buying pots in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com