esakal | लॉकडाउनमुळे मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं; जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ

बोलून बातमी शोधा

null
लॉकडाउनमुळे मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं; जीवनावश्‍यक वस्तूंच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा: संचारबंदी, लॉकडाउनचा (Corona Lockdown) फायदा घेत काही ठोक व्यापाऱ्यांनी (Businessmen) जीवनावश्‍यक वस्तूंची (Essentials) साठेबाजी करून भाव वाढविले आहे. जवळपास प्रत्येक वस्तूंवर दहा ते पंधरा टक्‍कांनी वाढ केल्याचे नागरिक बोलत आहेत. वेळेअभावी नागरिकसुद्धा भावबाजी न करता निमूटपणे दुकानदार म्हणेल, त्याच भावात माल खरेदी करीत आहे. संचारबंदीचा फायदा घेत काही व्यापारी चढ्या भावाने (Rate increased) मालाची विक्री करून सर्वसामान्यांची (Common people) गळचेपी करीत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने (Food and drug administration) लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (Rates of essentials things getting high due to lockdown)

हेही वाचा: 'महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका; नागपुरातील मराठा समाज संयोजकांचं परखड मत

शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन 15 मेपर्यंत वाढविले आहे. यात जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकानांना परवानगी दिली नाही. संचारबंदीचा फायदा घेत काही व्यापाऱ्यांनी जीवनावश्‍यक वस्तूंच्या साठेबाजीवर भर दिला आहे. काही वस्तूंचे भाव स्थिर असून इतर वस्तूंच्या भावात 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे नागरिक बोलत आहेत.

खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले आहेज. सद्य:स्थितीत किरकोळ बाजारात सोयाबीन तेल 164 रुपये प्रतिकिलो आहे. सोयाबीनच नसल्याने तेलाचे भाव वाढणारच आहे, असे व्यापारी सांगत आहे. कंपन्यांजवळ सोयाबीनच नाही, मग सोयाबीन तेल कुठून येत आहे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहे.

संचारबंदीत इलेक्‍ट्रीक वस्तूंची दुकाने बंद आहेत. मात्र, ऊन आग ओकत असल्याने नागरिकांना कुलर खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थिती कुलर विक्रेते संधी साधत दुकाने उघडून नागरिकांना चढ्या भावाने कूलरची विक्री करीत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने इलेक्‍ट्रीक दुकानांना दोन दिवस परवानगी द्यायला पाहिजे होती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: अमरावतीत लसीकरणाच्या लांबच लांब रांगांनी वाढवला नागरिकांचा पारा

शटर अपडाउन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 मे पर्यंत संचारबंदी आहे. केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे, पण काही व्यापारी नियमांचे उल्लंघन करीत आहे. बाजारपेठेत फेरफटका मारला तर दुकानाचे शटर अप-डाउन सुरूच असते. शिवाय बाहेरून शटरला लॉक तर आतमध्ये ग्राहकांची गर्दी असते. व्यापारी चढ्या भावाने मालाची विक्री करून ग्राहकांची आर्थिक लूट करीत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

(Rates of essentials things getting high due to lockdown)