
नागपूर : अहमदाबाद विमान दुर्घटनेत आपली मुलगी आणि १५ महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाल्यानंतर मनीष कामदार पूर्णपणे कोसळले आहेत. अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी असा दावा केला की एअरलाईन्स कंपनीने ब्रिटिश पासपोर्ट असूनसुद्धा त्यांच्याकडून अतिरिक्त एक हजार पाउंड शुल्क मागितले, जे कायदेशीर नव्हते. अहमदाबाद रुग्णालयाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.