
नागपूर : मनीषनगरला थेट वर्धा मार्गाशी जोडण्यात आता एका अंडरपासची भर पडली आहे. नव्या अंडरपासमुळे मनीषनगरवासीयांना बाराही महिने कनेक्टिव्हिटी मिळाली.तरीही भागाचा विस्तार बघता लवकरच आता तिसरी कनेक्टीव्हिटी तयार केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.