Nagpur अखेर अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : अखेर अतिवृष्टीची रक्कम खात्यात जमा

मानोरा : तालुक्यांतील काही बँकेसह गिरोली आणि शेंदूरजना (अ) महसूल मंडळात माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा संततधार पाऊस झाला, १७० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने शासनाने अतिवृष्टी ग्रस्त म्हणून वरील दोन मंडळ जाहीर केले होते, दिवाळीपूर्वी खात्यात अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी सुरु झाली होती,

मात्र महसूल विभागाच्या वतीने विलंब होत होता. याबाबत वर्तमानपत्रात ठळक अक्षरात बातमी प्रकाशित होताच महसूल व बँका खडबडून जागे होत शनिवारी २२ ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात बँक उघडून आरटीजिएस करून रक्कम जमा करण्यात आली तर बँकेत शेतकऱ्यांना विड्रल देण्यात येत असल्याचे पहावयास मिळाले.

अतिवृष्टीची रक्कम दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी महसूल विभागाला दिले होते. परंतु तहसील कार्यालया कडून बँकेला याद्या उशिरा पाठविल्या गेल्या त्यामुळे संबधित मंडळातील शेतकरी यांना मदत मिळत नव्हती आणखी एक आठवडा मदत मिळणार नाही, त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

यासंदर्भात "सकाळ" ने अतिवृष्टीच्या रकमेपासून शेतकरी वंचीत या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले.तालुक्यासह गीरोली व शेंदूरजना मंडळातील शेतकर्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला आहे. काही बँकात शनिवारी निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सामान घेतांना गर्दी करीत दिसत होते.

आंदोलनाचा दिला होता इशारा

तालुक्यांतील शेंदुरजना व गिरोली महसूल मंडळ अतिवृष्टी समाविष्ट झाला होता, दिवाळीच्या तोंडावर खात्यात रक्कम जमा न झाल्यामुळे जी.प.सदस्य अरविंद पाटील इंगोले यांनी शेतकरीसह इशारा दिला होता, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होत असल्याने इंगोले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार

अतिवृष्टीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास शनिवारी सुट्टीच्या दिवशी महसूल विभागाने आपले कर्तव्य पार पडल्यामुळे मानोरा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार रवी राठोड व कर्मचारी यांचा सत्कार केला आहे.