esakal | गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

बोलून बातमी शोधा

null

गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मातृत्वाचा आनंद स्त्रियांसाठी सर्वाधिक असतो. त्यातच घरी बाळाच्या रूपाने नवा पाहुणा येणार असल्याचा आनंद कुटुंबांतील साऱ्यांना हवाहवासा वाटतो. तो आनंद गगनात मावेनासा असल्यानेच प्रसूतीच्या वेदना गर्भवती माता आनंदाने सहन करते. मात्र, कोरोना काळात बाळ जन्माला घालावे की, नाही या संभ्रमात माता आहेत. कुटुंबीय देखील प्रसूती रोग तज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे डॉक्टरांच्या संवादातून पुढे आले. मात्र, कोरोना विषाणूंचा गर्भातील बाळाला धोका नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

हेही वाचा: नागपूरकरांनो, लॉकडाउनच्या नियमावलीत मोठे बदल: वाचा काय राहणार सुरू आणि काय बंद

कोरोना विषाणूने मनाची परिस्थिती चिंताजनक केली आहे. महिला घाबरत आहेत. नुकतेच गर्भधारणा झालेल्या एका मातेने प्रसूतीरोग तज्ज्ञांची भेट घेतली. कोरोनाच्या संक्रमणाच्या या काळात आई होणे सुरक्षित आहे का असा डॉक्टरांना केला. अचानक आलेल्या या प्रश्नाने डॉक्टरच अवाक झाले. महिलेची समजूत काढली. स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर कोणतीही अडचण येणार नाही, असे त्या महिलेचे समुपदेशन केले.

मात्र त्या मातेच्या मनातील कालवाकालव चेहऱ्यावर दिसत होती. प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ . चैतन्य शेंबेकर म्हणाले, हा विषाणू नव्या अवतारात समोर आला आहे. त्याचे नवीन स्ट्रेन बाहेर येत आहेत. गर्भवती महिलांनी स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली तर काहीच त्रास होणार नाही. गर्भधारणेदरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती बदलते. कोविड -१९ पासून प्रत्येकालाच धोका आहे. त्यात गर्भवती मातांनी काळजी करू नये. गर्भवती मातांना कोरोना झाला, तरी बाळापर्यंत तो पोहचत नाही. गुंतागुंत झाल्यास एखाद्यावेळी वेळेआधी प्रसूती होण्याचा धोका आहे.

हेही वाचा: धक्कादायक! कोरोना मृतदेहासोबत रुग्णांनी काढली अख्खी रात्र; नगर परिषद कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा

माता मानसिक तणावात...

कोरोनामुळे गर्भवतीमांतावर मानसिक ताण वाढला आहे. गर्भवती स्त्रीची मानसिक अवस्था काय आहे, हे दुसऱ्यांना कळत नाही. आपल्यासोबत आणखी एक जीव वाढत असल्याने सध्याच्या भयंकर वातावरणात स्वत:ची जास्त काळजी घ्यावी लागल्याने येणारा मानसिक ताण आणि कोरोनामुळे येणाऱ्या बाळासाठी सुरक्षित जीवन मिळेल काय? या मानसिक चक्रव्यूहात माता अडकल्या आहेत. तसेच घरातील ज्येष्ठ मंडळीचाही अंधश्रद्धेतून बाळ नको असाच दबाव वाढल्याचे दिसते.कुटुंबाची मर्जी राखण्यासाठी भीतीच्या वातावरणामुळे गर्भवती स्त्रिया संभ्रमात आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ