esakal | नागपूर जिल्ह्यातील शेकडो माता मातृवंदनाच्या लाभार्थी

बोलून बातमी शोधा

matruvandana

19 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी असून, या योजनेंतर्गत सरकारने 5 हजार रुपयांची तरतूद केली. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.

नागपूर जिल्ह्यातील शेकडो माता मातृवंदनाच्या लाभार्थी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महिला व बालकांच्या कल्याणाकरिता शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने सुरू केलेल्या मातृवंदना योजनेचा लाभ अखेर लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत "सकाळ'ने दखल घेत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले. वृत्ताची दखल घेऊन, नुकतेच मुंबईत झालेल्या बैठकीत या वृत्ताची दखल घेत, तांत्रिक अडचण दूर करीत वंचित लाभार्थी मातांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा - ते लहान मुलं आणि महिलांसह महागडे कपडे घालून आले अन...
आरोग्य विभागाने दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली असून, नागपूर जिल्ह्यातील काही भागात आशा सेविकांनी चुकीच्या ब्लॉगमध्ये लाभार्थ्यांची नावे टाकल्याने लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत होते. मूल तीन वर्षाचे झाले तरी, लाभ खात्यात जमा झाला नाही म्हणून अनेकींनी महिला बालकल्याण खात्याकडे तक्रारी केल्या होत्या. केंद्र सरकारद्वारे चालविण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम म्हणून महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने मातृवंदना योजना 2017 पासून राबविली जाते. भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करता समाजातील मोठा घटक मोलमजुरी करून जगत आहे. घरातील महिला व पुरुष दोघेही मोलमजुरी करतात. परंतु, गर्भधारणेच्या अवस्थेत महिलेला काम करताना अडचणी येत असल्याने ती काम करू शकत नाही. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक स्थिती खालावते. अशा स्थितीत या परिवाराला मदत मिळावी आणि जन्म आणि बालसंगोपनाला हातभार लागावा याकरिता ही योजना पूर्वी इंदिरा गांधी मातृत्व सहकारिता योजना, या नावाने सुरू करण्यात आली होती. आता ही योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या नावाने सुरू आहे. 19 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला या योजनांच्या लाभार्थी असून, या योजनेंतर्गत सरकारने 5 हजार रुपयांची तरतूद केली. या योजनेचा लाभ प्रत्येक गावातील महिलांना मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका, आरोग्यसेविका प्रयत्नरत आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.

वंचित महिलांना लाभ
नागपूर शहरासह कामठी, कळमेश्‍वर, हिंगणा ब्लॉगमधील काही लाभार्थी महिलांची यादी चुकीच्या ब्लॉगमध्ये भरल्याने लाभार्थी महिलांना लाभ मिळण्यास अडचणी येत होत्या. याबाबत मुंबईतील बैठकीत समस्या मांडल्यानंतर वरिष्ठ पातळीवर तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. त्यामुळे आता सर्व वंचित महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम एकत्रित पाच हजार रुपये जमा करण्यात येत आहे.
 रज्जू परिपगारे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, मातृवंदन योजना, नागपूर