
मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे, तर दुसरीकडे नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या दोन्ही आंदोलनांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.