
नागपूर : ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसींमधून आरक्षण देऊ नये, अशी आमची भूमिका आहे. सरकारने दबावाखाली येऊन जर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर राज्यातील नव्हे तर देशातील ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा आज येथे देण्यात आला.