esakal | कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या गंभीर; वाचा काय सांगतात डॉ. प्रशांत चक्करवार
sakal

बोलून बातमी शोधा

कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

sakal_logo
By
राजकुमार भीतकर

यवतमाळ : कोविडनंतर अनेकांना लैंगिक समस्यांनी ग्रासले आहे. यावर तातडीने उपचार केल्यास मात करता येते. सहा महिन्यांत लैंगिकविकाराच्या रुग्णांत अचानक चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. त्यात ‘कोविड-१९’ झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती येथील प्रसिद्ध मानसोपचार व लैगिंकविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत चक्करवार यांनी दिली. दै. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. (Sudden-increase-in-patients-with-sexual-problems)

आर्थिक, सामाजिक व राजकीय सर्वच क्षेत्रांवर या महामारीचा परिणाम झाला आहे. म्युकरमायकोसिस या पोस्टकोविड आजाराने धडकी भरवली आहे. कोविड झालेल्या अनेकांना रक्त जाड होणे, दम लागणे, निद्रानाश व झोप खूप लागणे, थकवा जाणवणे, हृदयरोग यासह अनेक तक्रारींचा समावेश करावा लागतो. शिवाय कोविडमुळे उद्भवलेली लैगिंक आजाराची समस्या फार गंभीर आहे. लैगिंकविकार तज्ज्ञ असल्यामुळे आपल्याकडे असे रुग्ण नेहमी येतात, असे डॉ. चक्करवार म्हणाले.

हेही वाचा: अन् चोरटा घुसला शौचालयात; मालकाने घेतली कडी लावून

कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, रोजगार गेले. त्यामुळे मानसिक ताण निर्माण झाल्याने ही समस्या उद्भवली असेल असे तज्ज्ञांना वाटते. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. काही ‘रिसर्च पेपर’ येत आहेत. त्यातून वेगळेच वास्तव समोर आले आहे. जगभरातील डॉक्टरांसाठीसुद्धा ही गोष्ट नवीन आहे. जानेवारी २०२१मध्ये अशा प्रकारचे ‘रिसर्च पेपर’ आले. कोरोना महामारीमुळे लैगिंक शिथिलतेचे रुग्ण वाढत असल्याचे जगभरातील लैंगिक विकार तज्ज्ञांचे मत आहे, असेही ते म्हणाले.

रक्तवाहिन्यांना सूज आली तर लिंगाकडे लैगिंक ताठरता येण्यासाठी आवश्यक तेवढा रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी लैगिंक शिथिलता येते. या व्यतिरिक्त कोविडच्या आजाराचा सेक्स हार्मोन्सवर पण परिणाम होतो का, यावर पण संशोधन सुरू असल्याचे डॉ. चक्करवार म्हणाले. कोरोना महामारीत वाढलेल्या मानसिक ताणामुळेसुद्धा लैगिंक समस्या निर्माण होत आहेत. कोविडमुळे खूप शारीरिक थकवा येतो, हेसुद्धा लैगिंक समस्येचे एक कारण असू शकते. यावरही संशोधन सुरू आहे. कोविडनंतर मानवी शरीरात ‘इन्फ्लेमेटरी प्रोसेस’ ३० ते ४० दिवस सुरू राहते. यावर योग्य उपचार करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रशांत चक्करवार यांनी व्यक्त केले.

कोविडनंतर उद्भवणारे विविध आजार व मानसिक ताण यामुळेही लैंगिक समस्या उद्भवू शकते. परंतु, नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. योग्य उपचार केल्यास लैंगिक समस्येवर मात करता येते.
- डॉ. प्रशांत चक्करवार, मानसोपचार व लैगिंक समस्या तज्ज्ञ, यवतमाळ

हेही वाचा: याला योगायोगच म्हणाल ना? वडिलांसह दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी

कौटुंबिक कलहाचा धोका

सप्टेंबर २०२० पासून लैगिंक शिथिलतेची समस्या घेऊन येणारे रुग्ण अचानक चार-पाच पटीने वाढले आहेत. हीच बाब अनेक जोडप्यांचा आनंद हिरावून घेणारी आहे. शिवाय, कुटुंबात कलह निर्माण करणारी ठरू शकते. भविष्यात सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात, असे मतही डॉ. चक्करवार यांनी व्यक्त केले.

(Sudden-increase-in-patients-with-sexual-problems)

loading image
go to top