Nagpur Blast: स्फोटाचा आवाज दहा किमीवर ऐकू आला, खिडक्या फुटल्या, घरांना भेगा, नागरिकांमध्ये दहशत
Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीजमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
धामणा (बाजारगाव) : जिल्ह्यातील बाजारगाव औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एचएमएक्स-आरडीएक्स विभागात हा स्फोट झाला.