

Supari Traders in Panic After ₹7 Crore Cash Seizure in Nagpur
Sakal
नागपूर : करचुकवेगिरी करणाऱ्या बड्या सुपारी व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने शनिवारी सुरू केलेली छापा कारवाई रविवारी दुसऱ्या दिवशीही चालली. या कारवाईत सात कोटींची रोख रक्कम, लाखो रुपयाची ज्वेलरी आणि कोट्यवधी रुपयाची सुपारी पकडल्याची माहिती पुढे आली आहे. या कारवाईमुळे अनेक सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.