
अचलपूर : चिखलदरा तालुक्यातील सलोना आरोग्यकेंद्रांतर्गत येत असलेल्या नागापूर गावातील रवीना केशव जामकर (वय २७) या स्तनदा मातेचा १० जून २०२५ रोजी अचलपूरच्या महिला व बालरुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही महिन्यांत धारणी, सलोना येथे झालेल्या बाल तथा मातामृत्यूची चौकशी पूर्ण झाली नसतानाच आता पुन्हा एका स्तनदा मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.