Mayo Hospital: मेयो हॉस्पिटल होणार अकरा मजली! इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

. १४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून याअंतर्गत ११ मजली इमारत उभी होणार आहे, असं नितीन गडकरी यांच्याकडून सांगण्यात आलं.
Mayo Hospital: मेयो हॉस्पिटल होणार अकरा मजली! इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
Updated on

Nagpur Mayo Hospital Reconstruction: उत्तम आरोग्यसेवा आणि अत्याधुनिक सोयी- सुविधांच्या आधारावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) हे केवळ नागपुरातीलच नव्हे तर देशातील आघाडीचे हॉस्पिटल व्हावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. १४६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून याअंतर्गत ११ मजली इमारत उभी होणार आहे, असेही ते म्हणाले.

मेयोत रुग्णसेवेकरिता ५०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच नवीन शव चिकित्सा गृह, प्रतीक्षा गृह, रुग्ण विभागाचा विस्तारित नोंदणी कक्ष या इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, भाजप नेते जयप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘मेयो हे नागपूरच्या इतिहासातील सर्वात जुने हॉस्पिटल आहे. पूर्व, उत्तर, मध्य नागपुरातील गरीब रुग्ण येथे मोठ्या प्रमाणात येतात. येथे ५०० खाटांच्या खाटांचे रुग्णालय भविष्यात उभे होईल. तेव्हा मोठ्या प्रमाणात गरिबांची सेवा होणार आहे, असेही गडकरी म्हणाले.(Latest Marathi News)

मेट्रोशी रुग्णालय जोडावे

नागपुरातील तापमानाचा विचार करता संपूर्ण रुग्णालय वातानुकूलित राहील, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. नवीन आराखड्यामध्ये शेजारच्या मेट्रो स्टेशनला हॉस्पिटल जोडून घ्यावे; जेणेकरून रुग्णांना खासगी वाहनाने येण्याची गरज पडणार नाही, असेही गडकरी म्हणाले. सोयीसाठी हॉस्पिटलपुढील रस्ता चारपदरी होणार असल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

Mayo Hospital: मेयो हॉस्पिटल होणार अकरा मजली! इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
Gashmeer Mahajani: "सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात…"; गश्मीरच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

‘सिकलसेलच्या रुग्णांचा विचार करा

सिकलसेल व थॅलेसिमिया ही नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भासाठी चिंतेची बाब आहे. मेडिकल, मेयो व एम्स या तिन्ही संस्थांनी मिळून सिकलसेल व थॅलेसिमियावरील अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार करावा. अवयव प्रत्यारोपण ते सिकलसेलपर्यंतच्या सर्व प्रकारच्या आजारांवरील उपचाराची सुविधा असावी, अशी सूचना गडकरी यांनी केली. (Latest Marathi News)

Mayo Hospital: मेयो हॉस्पिटल होणार अकरा मजली! इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
55 ex-Cong corporators Join BJP: चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का! नांदेडच्या ५५ माजी नगरसेवकांनी सोडली साथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com