Gashmeer Mahajani: "सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात…"; गश्मीरच्या ट्वीटनं वेधलं लक्ष

Gashmeer Mahajani: एका चाहत्यानं गश्मीरचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Gashmeer Mahajani
Gashmeer Mahajaniesakal
Updated on

Gashmeer Mahajani: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. गश्मीर हा विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. गश्मीर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. विविध पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करतो तसेच चाहत्यांच्या कमेंट्सला आणि पोस्टला देखील गश्मीर रिप्लाय देतो. अशताच आता गश्मीरनं एका चाहत्याच्या ट्वीटला रिप्लाय दिला आहे.

चाहत्याचं ट्वीट

एका चाहत्यानं गश्मीरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्या चाहत्यानं कॅप्शन दिलं, "मराठी सिनेअभिनेते सुपरस्टार गश्मीर महाजनी" चाहत्याच्या या ट्वीटला गश्मीरनं रिप्लाय दिला आहे.

गश्मीर म्हणाला, "प्लिज सुपरस्टार मला म्हणू नका…"

चाहत्यानं शेअर केलेल्या ट्वीटला गश्मीरनं रिप्लाय दिला, "प्लिज सुपरस्टार मला म्हणू नका… अजून सुपरस्टार व्हायला वेळ आहे. आता मराठीत कुणीच सुपरस्टार नाही. पण एक दिवस होणार नक्की.. सुपरस्टार तो असतो जो रस्त्यावरून चालला की सर्वलोक कपडे फाडतात… नक्की होणार … माझं वचन आहे. पण आत्ता इतकं सहज कुणाला सुपरस्टार म्हणू नका" गश्मीरच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Gashmeer Mahajani
Gashmir Mahajani: "तू मराठी मधील शाहरुख खान", फॅनने केलेल्या कौतुकावर गश्मीर म्हणाला...

गश्मीरचे चित्रपट

देऊळ बंद, कान्हा,सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात गश्मीरनं काम केलं आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी मनोरंजन सृष्टीत देखील गश्मीरनं विशेष ओळख निर्माण केली आहे. इमली,तेरे इश्क़ में घायल या हिंदी मालिकांमध्ये देखील गश्मीरनं काम केलं आहे. आता गश्मीरच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com