nagpur municipal corporation mayor election
sakal
नागपूर - महापौर व उपमहापौर पदाच्या नावावरून शुक्रवारी (ता. ३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात गडकरी यांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत महापौर पदाच्या उमेदवाराच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. शनिवारी (ता. ३१) सकाळी रजवाडा पॅलेस येथे होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.