

Nagpur Medical Set for a Corporate-Style Transformation
Sakal
नागपूर : मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या नागपुरातील मेडिकलला कॉर्पोरेट लूक येत असून आता रुग्णांच्या नातेवाईकांसाठी येथे निवारा केंद्र उभारले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने येत्या काही दिवसांत या रुग्णालयाचा चेहरा -मोहरा बदलेला दिसणार आहे. सोबतच रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा या रुग्णालयाचे वैशिष्ट्य ठरू लागले आहे. मेडिकलमध्ये विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील सर्वसामान्य रुग्णांचा सर्वात मोठा आधार आहे. त्यामुळेच शेजारच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील रुग्णही येथे उपचारासाठी येतात.