Nagpur : मेडिकलच्या अधिष्ठात्यांना गाडीच नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

car

मेडिकलच्या अधिष्ठात्यांना गाडीच नाही!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी चार वर्षे शासकीय वाहनाशिवाय काढली. ते निवृत्त होऊन दोन वर्षे लोटले. यानंतर मेडिकलच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. सजल मित्रा यांच्याकडे आले. त्यांनाही वाहन मिळाले नाही. सद्या मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता आहेत. ते देखील स्वतःच्या वाहनाने ये-जा करतात. सहा ते सात वर्षे लोटूनही मेडिकलच्या अधिष्ठातांना शासनाकडून वाहन उपलब्ध होऊ शकले नसल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून मेडिकलच्या अधिष्ठातांसाठी वाहन उपलब्ध करून देण्यात येते. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार असेपर्यंत वाहन होते. ते निवृत्त झाल्यानतंर तीन अधिष्ठाता आले. अद्यापही वाहन खरेदीचा प्रस्ताव थंडबस्त्यात आहे. तीन वर्षांपूर्वी वाहन खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. मधल्या काळात डॉ. मित्रा अधिष्ठाता असताना भाडेतत्त्वावरील वाहनाचा वापर सुरू होता. त्यावर लाखो रुपये खर्च झाले. मेडिकलच्या अधिष्ठातांसह इतरही अधिकाऱ्यांकडून या वाहनाचा वापर झाला. मात्र, या वाहनावरील खर्च कोणत्या हेडमध्ये करायचा यासंदर्भात आक्षेप घेण्यात आला होता. यामुळे भाडेतत्वावरील वाहन लावण्याचा प्रस्ताव मागे पडला.

loading image
go to top