
नागपूर : आतापर्यंत नागरिकांचे फोन घेण्यापुरता तसेच मॅसेज वाचणे, फोटो पाहण्यासह सोशल मीडियाच्या वापरासाठीच असलेल्या मोबाईलवरूनच सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक ऑनलाइन एकत्र येणार आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी होऊन मोबाईल, लॅपटॉपवरूनच नगरसेवकांना अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येणार आहे. ऑनलाइन सभेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे; परंतु यात सदस्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्य सरकारने महापालिकांना सर्वसाधारण सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय दिला आहे. मागील सभेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यानंतर येत्या २० ऑगस्टला होणारी सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे. महापालिकेत विविध पक्षांचे निवडून आलेले १५१ तर नामनिर्देशित ५, असे एकूण १५६ नगरसेवक असून सर्वांना या सभेबाबत तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय अधिकाऱ्यांनाही महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स विभागाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेची माहिती व मार्गदर्शन दिले आहे. २० ऑगस्टला सकाळी ११ वाजता सभा सुरू होणार आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने या सभेला विशेष महत्त्व आहे. सभेच्या ४५ मिनिटांपूर्वी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभेची लिंक पाठविण्यात येणार आहे.
प्रथमच ऑनलाइन प्रश्नोत्तरांचा तास होणार आहे. यात अधिकाऱ्यांसोबतच नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही कसोटी लागणार आहे. पहिलीच ऑनलाइन सभा असल्याने नगरसेवकांचा गोंधळ उडण्याचीही शक्यता आहे. याच सभेत सत्ताधारी पाणी करवाढ कमी करण्याचाही प्रस्ताव आणणार आहे. आयुक्तांचा याला विरोध आहे.
त्यामुळे आयुक्त व नगरसेवकांतील संघर्ष ऑनलाइन दिसून येणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले आहे. यावर चर्चा होणार आहे. ऑनलाइन चर्चेत नेमके काय घडणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
ऑनलाइन सभेसाठी नगरसेवकांना काय करावे लागणार?
वेबेक्स मीटिंग ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावे लागणार.
हेडफोनचा वापर
इंटरनेट व मोबाईल बॅटरीची खात्री करून घ्यावी.
सभेच्या २० मिनिटांपूर्वी उपस्थिती आवश्यक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.