मेहंदी लगाके रखना…

mendi
mendi

नागपूर : श्रावण सुरू झाला की, वेध लागतात, सणांचे. खास करून महिलांना विविध प्रकारच्या धार्मिक परंपरेत गुंफतानाच त्यांना विविध खेळ निसर्गाच्या सान्निध्यात खेळण्याची, मोकळेपणाने फिरण्याची, बागडण्याची संधी श्रावणात मिळते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या परंपरा आणि सणांचा आनंद लूटताना हातावरच्या मेंदींची साथ लाखमोलाची अन् हवीहवीशी ठरते.. परंपरागत मेंदीनेसुद्धा हल्ली आपले रंग बदललेले आहेत. लग्नप्रसंगी किंवा कुठल्याही समारंभात मेंदी लावलेले हात सर्वांनाच मोहित करतात. मग ते हात कोणत्याही वयोगटातले असोत..खुलवते मेंदी माझा रंग गोरा पान गं..असे म्हणूनच तर वर्णन केले जाते.. हल्ली स्त्रिया हातालाच नव्हे तर पाठ, दंड यावरही मेंदी लावतात. डिझायनर ड्रेस व ज्वेलरीबरोबरच डिझायनर मेंदीचा ट्रेंड आहे.

हातावर काढलेल्या मेंदीने आपल्या सौंदर्यात अधिकच भर पडते. खास करुन श्रावणात मेंदी अधिक प्रमाणात काढली जाते. श्रावणात बरेचसे सण येतात. या सणांच्यानिमित्ताने महिलांना वेध लागतात ते मेंदी काढण्याचे. अशाच काहीशा झटपट काढता येणाऱ्या मेंदी डिसाईन्स.

साधी मेंदी
साधी मेंदी ही हात भरुन काढली जाते. ही मेंदी लग्न समारंभात महिला वर्ग आवर्जून काढतात. काही महिला ही मेंदी काढताना मनगटापासून सुरुवात करतात. तर काहीवेळा ही मेंदी काढताना अर्ध्या हातापासून सुरुवात केली जाते. ही मेंदी काढण्यासाठी अधिक वेळ लागतो. ही मेंदी तळहाताच्या मागच्या बाजूने देखील काढली जाते. संपूर्ण हातावर काढलेली मेंदी उठावदार आणि आकर्षित करणारी असते.

फँटसी स्टाइल मेंदी
फॅंटसी मेकअपबरोबर आता तशाच स्टाइलची मेंदी लोकप्रिय झाली आहे. यात ड्रेस व ज्वेलरीच्या रंगांशी मेळ खात असलेल्या रंगांनी मेंदीचे डिझाइन केले जाते. या मेंदीत फँटसी मेकअपचा प्रयोग केला जातो. नंतर डिझाइनच्या अनुरूप रंगबिरंगी खडे व कुंदनचा प्रयोग करून सजवण्यात येते. ही मेंदी फारच सुंदर दिसते.

जरदौसी मेंदी
जरदौसी मेंदी सिल्व्हर किंवा गोल्डन शेडमध्ये असते. मेंदीने हातांवर सिल्व्हर किंवा गोल्डन रंगाने डिझाइन बनवण्यात येते. ही मेंदी फारच सुरेख दिसते.

अरेबिक मेंदी
अरेबिक मेंदी हा झटपट काढता येणाऱ्या मेंदीचा प्रकार आहे. ही मेंदी साध्या मेंदीपेक्षा अगदी वेगळी काढली जाते. अरेबिक मेंदी संपूर्ण हात भर काढली जात नसल्याने ही मेंदी काढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अरेबिक मेंदी जशी तळहातावर काढली जाते तशीच तळहाताच्या मागच्या बाजूस काढली जाते. या मेंदीमध्ये फुलांचे डिझाईन्स छान दिसते.

स्टिकर मेंदी
एखाद्या कार्यक्रमाला जायचे असल्यास आणि मेंदी काढण्याचा मूड झाल्यास आपण सहज दोन मिनिटात आपल्या हातावर मेंदी काढू शकतो. झटपट मेंदीकरता स्टिकर मेंदी हा एक उत्तम पर्याय आहे. या मेंदीची खासियत म्हणजे या मेंदीमध्ये विविध रंगाची मेंदी आपण आपल्या हातावर उमटवू शकतो. तसेच ही मेंदी दिसण्यास रंगीबेरंगी आणि आकर्षित असते.

ठसा मेंदी
मार्केटमध्ये आपल्या आवडीनुसार मेंदीचे डिझाईन्स पाहून मेंदीचे ठसे उमटवू शकतात. ही मेंदी हातावर कोरली जात नाही तर या मेंदीचा ठसा उमटवला जातो. ही मेंदी हातावर सुंदर आणि आकर्षक दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com