Metro Blood Bank : मनुष्यबळाअभावी थांबली मेट्रो ब्लड बॅंक ....नॅट रक्त तपासणीअभावी रक्तातून संसर्गाची भीती
Metro Blood Bank in Nagpur : नागपूरमधील डागा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढी १० वर्षे पूर्ण होऊनही सुरू झालेली नाही. मनुष्यबळाचा तुटवडा आणि नॅट तपासणीअभावी महिला रुग्णांना शुद्ध रक्त मिळवणे कठीण झाले आहे.
नागपूर : केंद्र सरकारने राज्यातील चार महानगरात ‘मेट्रो ब्लड बॅंक'' सुरू करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेतला होता. यातील एक रक्तपेढी डागा स्मृती स्त्री शासकीय रुग्णालयालयात सुरू होणार होती. नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात हे महत्त्वाचे पाऊल आहे.