esakal | मिहानमधील चाकरमान्यांसाठी मेट्रोची फिडर सेवा

बोलून बातमी शोधा

Metro feeder service for miners in Mihan

शहरातील सर्वच भागातील रहिवाशांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी महामेट्रोने आज खापरी मिहान स्टेशन येथून विविध स्तरातील फिडर सेवेला सुरुवात केली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी फित कापून सेवेला सुरुवात केल्याने मिहान भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिहानमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा भिन्न आहेत.

मिहानमधील चाकरमान्यांसाठी मेट्रोची फिडर सेवा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  मिहानमधील चाकरमान्यांना मेट्रोतून उतरल्यानंतर कामाचे ठिकाण तत्काळ व प्रदूषण न करता गाठण्यासाठी महामेट्रोने फिडर सेवेला आजपासून प्रारंभ केला. खापरी स्टेशनवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी ई-बाईक चालवून फिडर सेवेला प्रारंभ केला. आता मिहानमध्ये प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे रोजगार मिळविणाऱ्या जवळपास तीस हजारांवर नागरिकांना या सेवेचा लाभ होईल.

अवश्य वाचा - ‘या’ वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत


शहरातील सर्वच भागातील रहिवाशांना मेट्रो प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी महामेट्रोने आज खापरी मिहान स्टेशन येथून विविध स्तरातील फिडर सेवेला सुरुवात केली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी फित कापून सेवेला सुरुवात केल्याने मिहान भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिहानमधील विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा भिन्न आहेत. या कर्मचाऱ्यांना घर ते मेट्रो स्टेशन आणि मेट्रो स्टेशन ते कार्यस्थळापर्यंत जाण्यासाठी तसेच परतीसाठी महामेट्रो फिडर किंवा मल्टी मॉडल इंटिग्रेशनची संकल्पना राबवत आहे. फिडर सेवेसाठी महामेट्रोने 16 विविध कंपन्यांसोबत करार करण्याची तयारी केली. इ-ऑटो रिक्षा, इ-स्कूटर, इ-रिक्षा, इ-सायकल, एलपीजी ऑटो, एलपीजी-रिक्षासारख्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वी खापरी मेट्रो स्टेशन येथून इ-सायकल आणि बसच्या माध्यमाने फिडर सर्व्हिस सुरू होती. गेल्या काही वर्षात मिहान परिसरात अनेक कंपन्यांनी उद्योग थाटले आहेत. मिहानमधील विविध कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 10 हजारांवर असून, अप्रत्यक्ष रोजगार मिळणाऱ्यांची संख्या 30 हजारांवर आहे.
मिहानमधील एचसीएल, टीसीएस, इन्फोसेप्ट, टाल, एमआरओसारख्या प्रमुख कंपन्या ही फिडर सेवा सुरू करण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय लुपिन, हेग्झावेयर, ग्लोबल लॉजिक, एफएससीसारख्या कंपन्या आणि मोराजसारख्या निवासी संकुलातील रहिवासीदेखील या सेवेचा लाभ घेण्याचा उत्सुक आहेत. अशा प्रकारची सेवा सुरू करण्याची मागणी मिहानमध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली होती.