
हिंगणा : हिंगणा रोडवरील महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीसमोरील मेट्रोच्या उड्डाणपुलाखाली लावलेला वाहतूक सिग्नलचा खांब सध्या मोठ्या प्रमाणात वाकलेला आहे. तो कधीही कोसळू शकतो. खांबाची स्थिती अत्यंत धोकादायक झाली असून अपघाताचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे.