

Nagpur Migratory Birds Delay
sakal
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील तलावांवर या काळात परदेशी पक्ष्यांचे किलबिलाट सुरू असतो. परंतु यंदा हवामानातील अनिश्चिततेमुळे आणि लांबलेल्या पावसामुळे या पाहुण्यांचे आगमन उशिरा होणार आहे. अजूनही जिल्ह्यातील प्रमुख तलावांवर स्थलांतरित पक्ष्यांची चाहूल लागत नसल्याने पक्षीप्रेमी आणि अभ्यासक निराश झाले आहेत.