

Damaged car after a severe collision with a truck involving MoS Prataprao Jadhav’s convoy.
sakal
बुलडाणा: केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील मालेगावनजीक ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.