esakal | सामूहिक बलात्कारानं नागपूर हादरलं, अल्पवयीन मुलीवर ७ जणांचा अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

बलात्कार

आरोपींनी पीडितेला मारहाण देखील केली आहे.

नागपूर हादरलं! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सामूहिक बलात्काराच्या (minor girl physical abused nagpur) घटनेनं नागपूर पुन्हा एकदा हादरलं आहे. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात आरोपींनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना (nagpur crime) पुढे आली आहे. नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत (MIDC Police nagpur) येणाऱ्या इसासनी भागात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.

हेही वाचा: अविवाहित असल्याचे सांगून बलात्कार; प्रेयसीने प्राशन केले विष

नागपुरातील एमआयडीसी भागातील इसासनी भागात गुरुवारी रात्री ही घटना घडली. 17 वर्षीय पीडिता आपल्या मित्रासोबत याठिकाणी गेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीचा मित्र तिला सोबत घेऊन तीन दिवसांपासून देह व्यापार करत होता. गुरुवारी देखील तिला ग्राहकांकडे घेऊन गेला होता. दरम्यान, सात आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी मित्राला मारहाण करून मुलीवर बळजबरीने सामूहिक बलात्कार केला. यावेळी पीडितेने प्रतिकार केला असता तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करण्यात आली. त्यानंतर इसासनी परिसरात जोरदार भांडण झाल्यावर. वादाची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच इसासनी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पीडितेने स्वतःची आपबीती सांगितली. त्यावरून पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून मुलीच्या मित्रासह चार आरोपींना अटक केली आहे. पोलिस अद्याप तीन आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच पुढील तपास एमआयडीसी पोलिस करत असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.

loading image
go to top