esakal | आमदार कृष्णा खोपडे यांच्या बहीण जवायाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार कृष्णा खोपडे यांच्या बहीण जवायाची आत्महत्या

आमदार कृष्णा खोपडे यांच्या बहीण जवायाची आत्महत्या

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : आमदार कृष्णा खोपडे (MLA Krishna Khopade) यांचे बहीण जवाई परमेश्वर किसनजी ईटनकर यांनी सर्जिकल ब्लेडने गळा चिरून आत्महत्या (sister husband commits suicide) केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ते ६२, व्यंकटेशनगर कॉलनी येथे राहात होते. (MLA-Krishna-Khopade's-sister-husband-commits-suicide)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर ईटनकर हे मेडिकल हॉस्पिटल येथे शवविच्छेदन विभागात कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना पत्नी लक्ष्मीबाई असून मुले नाहीत. अनेक वर्षांपासून त्यांना मुळव्याधीचा त्रास होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी बरेच उपचार केले परंतु, प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यातच दोन महिन्यांपासून मुळव्याधीच्या आजाराने ते बरेच त्रस्त झाले होते.

हेही वाचा: विमला आर. नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी; ठाकरेंना नियुक्ती नाही

आजाराला कंटाळल्यामुळे ते अनेकदा नैराश्‍यात गेले होते. शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास ते फ्लॅटमधील बाथरूममध्ये गेले आणि सर्जिकल ब्लेडने गळा चिरला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. २० मिनिटे होऊन ते बाथरूममधूर बाहेर न आल्याने पत्नी लक्ष्मीबाईने त्यांना आवाज दिला. परंतु, त्यांनी आतून काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे लक्ष्मीबाईने शेजाऱ्यांना माहिती दिली.

शेजाऱ्यांनी देखील त्यांना आवाज दिला परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. लगेच त्यांना मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

(MLA-Krishna-Khopade's-sister-husband-commits-suicide)

loading image