esakal | आमदार रोहित पवार नागपूर मनपाच्या मदतीला आले धावून; पाठवले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार रोहित पवार नागपूर मनपाच्या मदतीला आले धावून; पाठवले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

आमदार रोहित पवार नागपूर मनपाच्या मदतीला आले धावून; पाठवले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः कोरोनाच्या (Coronavirus) काळात महापालिकेला (Nagpur NMC) राज्यातील इतर भागातून मदतीचा हात मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी त्यांच्या बारामती ॲग्रोतर्फे (Baramati Agro) महापालिकेला २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची (Oxygen Concentrator) भेट दिली. महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते, नगरसेवक व शहर पदाधिकाऱ्यांनी आज महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी.(Radhakrishnan B.) यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सोपविले. (MLA Rohit Pawar donate oxygen concentrators to Nagpur NMC)

हेही वाचा: कोरोनानं घेरलं, पण इच्छाशक्तीनं तारलं; ७५ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मनपा आरोग्य विभाग जोमाने काम करीत आहे. मनपा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. महापालिकेच्या या कार्यात अनेकजण मदत करीत आहे. यात आता आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’कडून मिळालेल्या मदतीचीही भर पडली.

आमदार रोहित पवार यांनी पाठविलेल्या एकूण ३८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी २० महापालिकेच्या आयुक्तांकडे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, युथ विंग अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, प्रेम झाडे, माजी नगरसेवक अशोक काटले, अर्चना हर्षे, श्याम मंडपे, लक्ष्मी सावरकर, कुणाल राऊत यांनी हे ऑक्सिजन कॉऩ्सन्ट्रेटर आयुक्तांना सोपविले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांची नागपूरकरांना वर्षभरात दुसऱ्यांदा मदत होत आहे. मागील वर्षी त्यांनी ट्रक भरून सॅनिटायझरचा पुरवठा केला होता.

आयुक्तांनी मानले आभार

मनपा प्रशासनाचे हात बळकट करण्यासाठी ही मोठी भेट ठरणार आहे. २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे नमुद करीत मनपा आयुक्त राधाकृष्णन यांनी ‘बारामती ॲग्रो’, आमदार रोहित पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

हेही वाचा: म्युकरमायकोसिसशी लढण्यासाठी कोणते धोरण आखले? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

विभागीय आयुक्तांना १८ कॉन्सन्ट्रेटर

३८ पैकी २० कॉन्सन्ट्रेटर महापालिकेला दिल्यानंतर उर्वरित १८ कॉन्सन्ट्रेटर विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना सोपविण्यात आले. राज्यात विविध जिल्ह्यात पाचशेवर ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर बारामती ॲग्रोतर्फे पाठवण्यात आले आहेत.

(MLA Rohit Pawar donate oxygen concentrators to Nagpur NMC)