esakal | कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शिवसेना हिंदुत्वापासून दूर; मनसे युवा नेते अमित ठाकरेंची घणाघाती टीका 
sakal

बोलून बातमी शोधा

MNS leader Amit Thackeray criticized Shivsena in Nagpur

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे खाजगी कार्यक्रमासाठी अमरावतीला रवाना होण्यापूर्वी आज नागपुरात थांबले असता त्यांंनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी पक्षबांधणी, राज्य सरकारचा कारभार, सामाजिक प्रश्नावर भाष्य केले

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमुळेच शिवसेना हिंदुत्वापासून दूर; मनसे युवा नेते अमित ठाकरेंची घणाघाती टीका 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर ः शिवजंयतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारून शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचे अधोरेखित झाले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीमुळे शिवसेना हिंदुत्वापासून लांब गेल्याचा आरोप मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही तोंडसुख घेतले. 

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे खाजगी कार्यक्रमासाठी अमरावतीला रवाना होण्यापूर्वी आज नागपुरात थांबले असता त्यांंनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी पक्षबांधणी, राज्य सरकारचा कारभार, सामाजिक प्रश्नावर भाष्य केले. राज्य सरकारवर टिका करताना ते म्हणाले, राज्यात सरकारच्या कारभाराबाबत कुणीही आनंदी नाही. आरोग्य सेवक, शिक्षक, तरुण वर्ग सारेच वेगवेगळे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे राज्यात कोण खूष आहे? असा सवालही त्यांनी केला. 

हेही वाचा -  जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने...

माझ्यावर पक्षाने नवी जबाबदारी दिली आहे. ती योग्यरित्या पार पाडण्यासाठी पक्ष बांधणी करण्याचे ठरविले आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इतर पक्ष काय करतात याचा विचार करत नाही. मनसेला वाढविण्यासाठी काय करता येईल याचा सतत विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्य सरकारने शिवजयंतीच्या मिरवणूकीला परवानगी नाकारल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी महापुरुषांच्या जयंत्या सणाप्रमाणे साजऱ्या करण्यात आल्या पाहिजे, असे सांगितले. सरकारने शिवजयंतीच्या मिरवणुसाठी परवानगी दिलीच पाहिजे. मिरवणुकीला परवानगी नाकारून शिवसेनेने हिदुत्वापासून दूर गेल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच सेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 

हेही वाचा - ‘मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...

देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतरही पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटले नाही. आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी प्रश्न सोडविण्यावर भर दिला पाहिजे. कुठे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याबाबत तरुणांना माहिती मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर प्रमुख अजय ढोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image