मनसे देणार शिवसेनेला पर्याय; नव्या युतीचे संकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Raj Thackeray Offer Shiv Sena Signs of new alliance politics nagpur

मनसे देणार शिवसेनेला पर्याय; नव्या युतीचे संकेत

नागपूर : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई-पुण्यासह नागपूर तसेच विदर्भात शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मोठा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे १३ सप्टेंबरला नागपूर येथे असल्याचे समजते. शिवसेनेला फोडल्यानंतर त्यांचा मतदार सहजासहजी भाजपला मते देणार नाही. त्याला पर्याय म्हणून राज ठाकरे यांची सेना उभी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा बऱ्यापैकी दबदबा आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्तासुद्धा होती. मात्र विदर्भाकडे सुरुवातीपासूनच मनसेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. पक्षही रसातळाला गेला. विदर्भात शिवसेनेची व्होट बँक असल्याने ती आपल्याकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याकरिता वर्षानुवर्षांपासून चिकटून असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली जाणार असून काही आक्रमक तसेच ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. नाराज होऊन बाहेर पडलेल्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा बोलावले जात असून याकरिता एक चमू कामाला लावण्यात आली आहे.

अविनाश जाधवांवर जबाबदारी

राज ठाकरे यांचे विश्वासून अविनाश जाधव यांच्यावर विदर्भातील मनसेला सक्रिय करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ते काही आपल्या सहकाऱ्यांना घेऊन १० सप्टेंबरला नागपूरमध्ये येत आहेत. या दौऱ्यात ते काही खास लोकांच्या गाठीभेटी घेणार आहेत. विदर्भातील राजकीय परिस्थिती, संघटना, कार्यकर्त्यांचा अहवाल तयार करून ते पक्षाकडे सादर करतील. त्यानंतर राज ठाकरे यांचा १३ सप्टेंबरचा दौरा निश्चित केला जाणार असल्याचे विश्वसनीय माहिती आहे.

Web Title: Mns Raj Thackeray Offer Shiv Sena Signs Of New Alliance Politics Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..