Wind Monitoring System : आधुनिक ‘विंड मॉनिटरिंग सिस्टिम’ने वाढणार रेल्वेची सुरक्षा

हवेच्या वेगाची मिळणार माहिती ः नागपूर विभागात यंत्रणा कार्यान्वित
Wind Monitoring System
Wind Monitoring SystemSakal

Nagpur News : वातावरणात अचानक हवेचा वेग वाढल्याने धावत्या रेल्वेवर त्याचा परिणाम होतो. विद्युत तारेला पॅन्टाग्राफ अडकण्याची भीती असते. हा धोका टाळण्यासाठी मध्य रेल्वेने नागपूर विभागात ‘ॲनिमोमीटर विंड मॉनिटरिंग सिस्टम’ कार्यान्वित केली आहे. यातून रेल्वेचा धोका टाळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास मध्य रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. ॲनिमोमीटर हे उपकरणे वाऱ्याचा वेग मोजणार आहे.

जेव्हा वेग ६० किमी प्रतितास पेक्षा जास्त असेल तेव्हा यंत्रणेचा अलार्म वाजणार आहे. त्यामुळे कर्मचारी सतर्क होतील. उच्च वाऱ्यांमुळे पॅन्टोग्राफ अडकण्यासारखी घटना टाळण्यास मदत होईल.

वेगाचे सुक्ष्म विश्लेषण

हवामानात ॲनिमोमीटरने गुरुवारी नागपूर सिंधी विभागात १०.०० ते १०.४५ वाजता दरम्यान वाऱ्याच्या वेगाचे सुक्ष्म विश्लेषण केले. यात ६० किमी/तास पेक्षा जास्त वेग २३ वेळा नोंदवला गेला.

या डेटाचा उपयोग करून रेल्वे वाऱ्याच्या वाढलेल्या वेगाला प्रतिसाद म्हणून योग्य खबरदारी घेऊ शकते. खबरदारी घेताना तात्पुरते वेग प्रतिबंध लागू करणे, वेग कमी करून पॅन्टाग्राफ अडकण्याचा धोका कमी करता येणार आहे.

ॲनिमोमीटर यंत्रणेचे फायदे

  • गंभीर ठिकाणी सतत वाऱ्याचा वेग मोजणे

  • रिअल-टाइमकरिता इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक डेटा एकत्रित होईल

  • संभाव्य धोकादायक वाऱ्याच्या वेगाबद्दल कर्मचाऱ्यांना सावध करणार

  • व्हिज्युअल डिस्प्ले आणि अलार्म यंत्रणा विकसित

  • घटना टाळण्यासाठी तात्पुरते वेग प्रतिबंध लागू करण्याची क्षमता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com