Nagpur Weather: विदर्भात पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा नागपूरसाठी २५ व २६ जुलैला ऑरेंज अलर्ट, कसे असेल हवामान?
Monsoon Update: प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी नागपूर शहरातील काही भागात जोरदार पाऊस झाला. मात्र सायंकाळी आभाळ दाटूनही पाऊस न पडल्याने नागपूरकरांचा काहीसा हिरमोड झाला.
नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत पावसाने अपेक्षेप्रमाणे बुधवारी शहरातील काही भागांत दमदार हजेरी लावली. मात्र सायंकाळी आभाळ दाटूनही धो-धो पाऊस न बरसल्याने नागपूरकरांचा काहीसा हिरमोड झाला.