
मोर्शी : मोर्शीचे नायब तहसीलदार आपल्या चमूसह अवैध वाळूची तपासणी करीत असताना एका वाळूतस्कराने त्यांना धक्काबुक्की केल्याचा व अन्य एका घटनेत एका अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने रस्त्यावर रेती टाकून पळ काढल्याची घटना मोर्शी शहरात घडली. या दोन्ही प्रकरणी मोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.