Nagpur Crime News : मुलीवर आईच्या मित्राने केला अत्याचार; आईला अटक, मित्र फरार

रोहित सातत्याने अत्याचार आणि विनयभंग करीत असल्याने पीडितेने घरातून पलायन केल्याची माहिती समोर आली
mother friend abuse her daughter molest crime 1 arrest 1 abscond nagpur marathi news
mother friend abuse her daughter molest crime 1 arrest 1 abscond nagpur marathi newsSakal
Updated on

नागपूर : आईच्या मित्राने घरात येऊन १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याबाबत मुलीने वारंवार आईला सांगूनही तिने दुर्लक्ष करीत, मुलीवर अत्याचाराला मूकसंमती दिल्याची धक्कादायक घटना जरीपटका पोलिस हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आईला अटक केली असून मित्र फरार आहे.

रोहित चौरे (रा. कळमना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता दहावीत शिकत असून तिच्या वडिलांचे निधन झाले. ती आईसोबत राहते. आईची २०१९ साली कार्यालयात रोहित चौरे याच्याशी ओळख झाली. तो नियमित घरी येऊ लागला. दरम्यान घरी आल्यावर तो पीडितेशी अश्लील चाळे करायचा.

mother friend abuse her daughter molest crime 1 arrest 1 abscond nagpur marathi news
Mumbai Crime : 3 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार; मुलाची बालसुधारगृहात रवानगी

अनेकदा शरीराला हात लावणे, विचित्र हावभाव करणे आणि त्रास देणे असे प्रकार तो करायचा. याबाबत सातत्याने ती आईला सांगत होती. मात्र, त्याकडे आईने दुर्लक्ष केले. गेल्यावर्षी २०२२ साली दुपारी घरी सगळे असताना रोहित चौरे घरी आला.

पीडिता आणि तिची बहीण रुममध्ये गेले. तिथे त्याने तोंड दाबून अत्याचार केला. ही बाब आईला सांगितल्यावरही तिने दुर्लक्ष केले. त्यानंतरही सातत्याने त्याने अत्याचार केला. लहान बहिणीचाही विनयभंग केला. दरम्यान याबाबत आत्याला माहिती दिल्यावर तक्रार दिली.

mother friend abuse her daughter molest crime 1 arrest 1 abscond nagpur marathi news
Crime News: चिटफंडमधून नागरिकांकडून कोट्यवधी उकळले; मध्य प्रदेशातून पोलिसांनी केली अटक !

अत्याचारामुळे पलायन

रोहित सातत्याने अत्याचार आणि विनयभंग करीत असल्याने पीडितेने घरातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यावर अत्याचार होत असताना, आईने त्याकडे दुर्लक्ष केले, याशिवाय तिच्याशी भांडण केले. त्यातून पीडिता घरातून मध्यप्रदेशात पळून केली होती. दरम्यान परत आल्यावर तिने ही हकिकत आत्याला सांगितल्यावर तिच्या मदतीने पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com