madhya pradesh cm mohan yadav
sakal
नागपूर - तमिळनाडू राज्यातील औषध कंपनीनिर्मित दूषित कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील मुलांचा नागपुरात मृत्यू झाला. या मृत्यूला पूर्णतः जबाबदार औषधी कंपनी आहे. तमिळनाडूतील औषध कंपनीशी संबंधित जबाबदार व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देतानाच, या प्रकरणात तमिळनाडू सरकारने सहकार्य केले पाहिजे, मात्र सहकार्य मिळत नसल्याचा गंभीर आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आज येथे केला.