Nagpur : महावितरणची थकबाकी ७३ हजार कोटींची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL
महावितरणची थकबाकी ७३ हजार कोटींची

महावितरणची थकबाकी ७३ हजार कोटींची

नागपूर : महावितरणकडून वीज बिलाची माफी मागणे व वीज बिल न भरणे चुकीचे व अवाजवी आहे. त्यामुळे मोबाईल व केबल नेटवर्क सारख्या सेवांचे बिल थकीत न ठेवणाऱ्या वीज ग्राहकांनी महावितरणचेही वीज बिल नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

कोरोना काळात सर्व यंत्रणा ठप्प असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता फिल्डवर जाऊन अहोरात्र सेवा दिली. अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा असल्यामुळेच वैद्यकीय क्षेत्र असो वा इतर सर्व शासकीय यंत्रणा, सर्वाना आपले काम करताना अडचण जाणवली नाही. सर्वसामान्य लोकांनाही या काळात वर्क फ्रॉम होम केवळ महावितरणमुळे शक्य झाले. मात्र, वीजबिलाची थकबाकी साचल्याने कोरोना काळापासून महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या या थकबाकीचा डोंगर ७३ हजार कोटीच्या पुढे गेला आहे. वीज बिलाची थकबाकी वाढत असताना महावितरणचा दैनंदिन खर्च कायमच होता. त्यामुळे महावितरणला कर्ज काढून यंत्रणा चालवावी लागत आहे.

महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे प्रयत्न करीत आहे. वसुलीचा वेग वाढवून महावितरणचे सर्व कर्मचारीही कंपनीचे अस्तित्व टिकविण्यासाठी प्रचंड धडपड करीत आहे. परंतु तरीही थकबाकी कायम आहे. तसेच महावितरणने वीज बिलात सवलत द्यावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या महावितरणला ग्राहकांची ही अपेक्षा पूर्ण करता येणे अशक्य आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या वीज बिलाचे पैसे नियमित भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

loading image
go to top