Vijay Wadettiwar: मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार : विजय वडेट्टीवार
Maharashtra Politics: मुंबई-अहमदाबाद मार्गावरील अधिसूचनेवरून विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मुंबई कुणाच्या इशाऱ्यावर चालणार असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
नागपूर : मुंबई-अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. याची अधिसूचना पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजराती भाषेत काढली असून ही सुरुवात आहे. पालघरपासून गुजरातीचा शिरकाव करण्यात येत आहे.