
चांदूरबाजार: शेतकरी आणि दिव्यांगांच्या न्याय्य हक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसंदर्भात गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देत स्थानिक प्रहार कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता. १०) चांदूरबाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात मुंडण, तर पूर्णा प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन केले.